जळगाव, (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, जळगाव जिल्हा शाखेतर्फे आज गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी संपात सहभागी होत जिल्हाधिकारी जळगाव कार्यालय आवारात निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री मगन पाटील- जिल्हाध्यक्ष, श्री विलास नेरकर- जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघटना, श्री बी. एम. चौधरी- कोषाध्यक्ष, श्री अमर परदेशी- राज्य संघटक आणि जिल्हा सरचिटणीस, श्री सर्जेराव बेडीसकर- चेअरमन, समन्वय समिती, श्री देविदास अडकमोल- जिल्हाध्यक्ष, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, श्री शशिकांत साळवे- संघटक आणि सरचिटणीस, सहकार खाते कर्मचारी संघटना, श्री योगेश नन्नवरे, संघटक, श्री व्ही.जे.जगताप- सह.कोषाध्यक्ष, सौ. छाया तडवी- महिला जिल्हाध्यक्षा यांनी संपाबाबत भूमिका विषद केली.
यावेळी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन श्री शशिकांत साळवे यांनी केले. तसेच दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या बॉंबस्फोट हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना आणि शहिदांना श्री सर्जेराव बेडीसकर यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाऊसाहेब महाले- जिल्हाध्यक्ष, सहकार खाते कर्मचारी संघटना, शैलेंद्र परदेशी, महेंद्र सोनवणे, देवेंद्र चंदनकर, सौ सुरेखा लष्करे, सौ सुलोचना पाटील, दिलीप बारी, गोविंदा पाटील, विलास पवार, नागेश हडपे, नितिन चौधरी, डी.एन.गोहिल, हेमंत नारखेडे, व्ही.एन.तायडे, एस.एच.चव्हाण, व्ही.डी. नाईक, यशवंत जडे, लक्ष्मण काकडे, संजय ठाकरे, राहुल पाटील, विलास पाटील, शे.नुर शे.लाल, अनिल राणे, दत्तू बडगुजर, चेतन परदेशी, बंडू सोनार, धिरज पाटील, संजय शिंदे, विक्रांत म्हस्के, राकेश ठाकरे, गिरिश रत्नपारखे, राजेंद्र पाटील, राजेंद्र जोशी, दिलीप कोठावदे, हरिष पाटील, निलेश घाटोळ ईत्यादि विविध कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निदर्शनांनंतर संपाबाबतची भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन श्री प्रविण महाजन, अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव यांना श्री मगन पाटील-जिल्हाध्यक्ष, श्री अमर परदेशी-राज्य संघटक आणि जिल्हा सरचिटणीस, श्री देविदास अडकमोल- जिल्हाध्यक्ष, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, सौ. छाया तडवी- महिला जिल्हाध्यक्षा, श्री शशिकांत साळवे- संघटक, श्री व्ही.जे. जगताप- सह.कोषाध्यक्ष या प्रतिनिधींनी निवेदन दिले.