खिर्डी (प्रतिनिधी):-दि.२४ – आगामी हिवाळी अधिवेशनावर मा.दशरथजी भांडे यांच्या नेतृत्वाखाली महाआक्रोश मोर्चा ९ डिसेंबर २०२० ला काढण्यासंदर्भात नियोजन तसेच संघटना बाधणीच्या संदर्भात गाते येथील बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरामध्ये नितीन भाऊ काडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी समिती चे संयोजक अॅड. गणेश भाऊ सोनवणे,उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना जिल्हाअध्यक्ष मंगल काडेलकर, युवक जि.अध्यक्ष प्रशांत सोनवणे, महीला आघाडी जि.अध्यक्ष सुनिता तायडे,मुक्ताईनगर ता.अध्यक्ष संजय काडेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रावेर तालुक्यातून मुंबई येथे जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे असे सांगितले.
याप्रसंगी बैठकीत जिल्हा व रावेर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ कोळी रंणगाव,जि.सदस्य हरलाल कोळी कांडवेल, विनोद कोळी खिर्डी,रावेर ता.अध्यक्ष मनोहर कोळी सुलवाडी,ता.उपाध्यक्ष सुभाष सपकाळे सुनोदा ता.उपाध्यक्ष,अशोक सपकाळे मोरगाव, सरचिटणीस उत्तम कोळी रायपुर , सहसंघटक गफूरभाई कोळी खिर्डी, संघटक नितीन कोळी तासखेडा,प्रसिद्ध प्रमुख उमेश कोळी पातोडी ,युवक ता.अध्यक्ष चंद्रकांत कोळी गाते,उपाध्यक्ष रविंद्र कोळी मस्कावद ,ता.सरचिटणीस नकुल कोळी मागलवाडी,प्र.प्रमुख भागवत कोळी, महिला आघाडी ता.अध्यक्षा सुनीता कोळी निबोल,उपाध्यक्ष सुमनबाई तायडे गाते, सहसंघटक भारती कोळी,सदस्य-राहुल कोळी पुरी, विनोद ह.कोळी,बाळू कोळी रणगाव ,जंगलू बावीस्कर सुनोदा ,तरूण कोळी खिरवड, प्रविण कोळी कोळदा आदींची निवड करण्यात आली. सुत्रसंचालन सुभाष सपकाळे यांनी केले व आभार विश्वनाथ कोळी यांनी मानले.