पाचोरा- कोरोना (कोविड-१९) आजार संक्रमणाच्या प्रारंभीच्या काळातील वाढीव अवाजवी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा राज्यातील ठाकरे सरकारने केली होती.मात्र 17 नोव्हेंबर रोजी ऊर्जामंत्री मा.नितीन राऊत यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन सवलत देता येणार नाही. नागरिकांना वीज बिल भरावीच लागतील असे सांगून,सक्तीने वीजबिल वसूल करण्याचे काम सुरु करुन जनतेचा विश्वासघात केला आहे. वाढीव व अवाजवी वीज बिलामुळे महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी,मजूर,व्यापारी,नोकरदार सर्व जनता त्रस्त असून शेतकरी बांधवांचा रब्बी हंगाम हंगाम सुरू असून शेती सिंचनासाठी व ग्रामीण भागात त्रासदायक ठरलेले वारंवार नादुरुस्त होणारे ट्रान्सफार्मर त्यासाठी लागणारे ऑईल व तत्सम साहित्याची असणारी कमतरता या समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी तर्फे वीजबिल होळी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पुकारण्यात आले असून पाचोरा येथे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात छ.शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले यावेळी ‘वाढीव वीजबिलाने जनता त्रस्त,’ ठाकरे सरकार सत्तेच्या धुंदीत मस्त…
अश्या घोषणा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या व सरकार चा निषेध केला.आंदोलनातील प्रमुख मागण्या-
१)शासनाने आर्थिक व दुर्बल घटकांतील ० ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे ५ वर्षाचे वीजबिल माफ करू ही घोषणा पूर्ण करावी.
२)शासनाने सरासरी वीज बिलाची दुरुस्ती करून सोबत दिलेली उर्वरित वीज बिल भरण्याची सवलत द्यावी
३)शासनाने कोविड-१९ संचारबंदी काळातील मार्च,एप्रिल,मे व जून हे चार महिन्यांचे ० ते १०० व ० ते ३०० या वर्गातील वीज बिले माफ करावी.
४)शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा.
५)ग्रामीण भागात वारंवार नादुरुस्त होणारे ट्रान्सफार्मर 48 तासांच्या आत बदलून मिळावे तसेच त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे.
या प्रमुख मागण्यांचे निवेदन मा.प्रांताधिकारी पाचोरा व कार्यकारी अभियंता महावितरण पाचोरा यांना देण्यात आले या प्रसंगी उपस्थित भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, तालुका सरचिटणीस संजय पाटील,शहर सरचिटणीस दीपक माने,राजेश संचिती,युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान मुळे,विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील,कुमार खेडकर, सोहन मोरे,ज्येष्ठ कार्यकर्ते गोरक्षबापू देवरे,किशोर संचेती,कांतीलाल जैन,भरतजीभु पा टील,रमेश शामनानी,विलास पाटील,देवराम लोणारी,अजय सोनार,जगन सोनवणे,एकनाथ महाजन,बंटी राठोड,अनिल परदेशी आदी उपस्थित होते.