जळगांव- जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रतिकभाई सपकाळे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत रवि राणा यांची सदिच्छा भेट घेतली असून लवकरच जळगाव जिल्ह्यात युवा स्वाभिमानी पार्टीच नेतृत्व स्विकरणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले तर संस्थापक अध्यक्ष रविभाऊ राणा यांनी सपकाळे यांना जळगाव जिल्ह्याचे युवक नेतृत्व आपल्याच हातात राहील असे आश्वासन दिले.
प्रतिक सपकाळे यांना पक्षाची फार मोठी जवाबदारी देण्यात येत असल्याचे नवनीत राणा यांनी संगितले तसेच विधान सभा निवळणुकी पूर्वी आमदार रविभाऊ राणा खासदार नवनीत रवि राणा ह्यां जळगाव नगरीत येणार असून आगामी विधानसभा निवळणुकी वर संघटन मजबूत करणार असून नविन शाखा उदघाटन ही करणार आहेत
या वेळी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक सपकाळे यांना सांगितले की मी अमरावती पूर्ति मर्यादित नसून अखंड महाराष्ट्राच्या विकासा साठी झटत आहे व कटी बद्ध आहे व् प्रतीक सपकाळे सारखे युवक माझ्या सोबत आहेत याचा मला अभिमान आहे यावेळी प्रतिक सपकाळे यांनी आमदार रविभाऊ राणा यांचे मोठे बंधू सुनील भाऊ राणा यांची ही भेट घेतली आगामी विधान सभा निवलणुकी साठी सुनील भाऊ राणा यांना शुभेच्छा ही दिल्या तसेच या वेळी पक्षाचे महासचिव शैलेन्द्र कस्तूरे साहेब उपस्थित होते यावेळी हेमंत सोनवणे,खुशाल बारी गोपाल भोई किरण तेली अविनाश पारधे उपस्थित होते.