जळगाव, दि. 19 – पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदर भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत. माहे डिसेंबर, 2020 च्या नियतनात भरडधान्य (मका) प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
त्यानुसार प्राधान्य कुटुंब योजना प्रति लाभार्थी गहू 1 कि.ग्रॅ. प्रती किलो 2 रुपये दराने, मका 2 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने व तांदुळ 2 कि.ग्रॅ. प्रती किलो 3 रुपये दराने प्रति सदस्य वितरीत करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभिजित राऊत जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.