हंडामोर्चा काढूनही प्रशासनाची उदासीनता कायम
पारोळा – खेडीढोक ता .पारोळा येथे पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून तहसील कार्यालय पारोळा येथे महिलांनी हंडा मोर्चा काढूनही प्रशासनाची उदासीनता कायम दिसून येत आहे .
गावातील विहिरीनीं पूर्णपणे तळ गाठला असून टँकर द्वारे विहिरीत पाणी टाकून गावात पाणी पुरवठा केला जात आहे . वाढीव टँकर ची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे .