जळगाव – राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे श्रीकांत रवींद्र राजपूत (चाळीसगाव), पंजाबराव गुणवंतराव देशमुख (लोंढे, ता.चाळीसगाव) व प्रल्हाद रघुनाथ वाघ (कळमसरा, ता.पाचोरा) यांना युवा कु्षीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्रीकांत राजपूत हे कु्षी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आहेत. पंजाबराव देशमुख हे कु्षी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष आहेत. तर प्रल्हाद वाघ हे कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे जळगाव जिल्हा उपअध्यक्ष आहेत तसेच कृषी क्षेत्रात काम करत असतांना सदैव तिघंही पुरस्कारार्थी शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत. ते शेतकरी, शेतमजूर आणि शेतीवर आधारित विविध उद्योग, व्यवसाय, जोडधंदे आदी विषयी संबंधिताना वेळोवेळी मार्गदर्शन, जनजागु्ती करतात. त्यांच्या शेतकरी हिताचा वसा व उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन तिघांना संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी कळविले आहे.