मुंबई, – मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोविड रुग्णालय बांधण्यासाठी 3 हजार कोटी किंमतीची जमीन खरेदी करण्याच्या मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या निर्णयाची लोकायुक्तांनी चौकशी करावी असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले असल्याची माहिती भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी शुक्रवारी दिली.या बाबत सोमैय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती.
माननीय राज्यपालानी ही तक्रार/याचिका लोकायुक्तांकडे पाठविली आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश माननीय राज्यपाल यांनी दिले आहे.या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा डॉ. सोमैय्या यांचा आरोप आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.