चाळीसगाव ( किशोर शेवरे) – कोरोना काळात अनेक मजुरांचे काम गेले हाताला काम नसल्यामुळे गोरगरीब कुंटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून रयत सेनेच्या वतीने दि १३ रोजी नागद रोड वस्तीत घरेलु कामगार महिलांना दिवाळी निमित्त रयत सेनेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. दिवाळी निमित्त फराळ मिळाल्याने कामगार माहिलांची दिवाळी गोड झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
गेल्या 9 महिन्यापासून कोरोना व लॉकडावून असल्याने ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचा रोजगार बुडाल्याने गरीब कुटुंबाना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आणि ऐन कोरोना काळात दिपावली सारखा सण आल्याने खायचे काय व दिपावली त फराळ व गोडधोड काय करावे हा यक्षप्रश्न मजुरी करणाऱ्या कुटुंबापुढे होते मात्र सालाबादाप्रमाणे रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी नागद रोडवरील घरेलू कामगार महिलांची दिवाळी गोड केली. नागद रोड वस्तीत घरलु कामगार महिलांना रयत सेनेच्या वतीने दि १३ रोजी दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले यावेळी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश कार्याध्यक्ष संता पहेलवान,ह्यूमन राइट्स शहर अध्यक्ष सुमित भोसले,प्रदेश सचिव प्रमोद वाघ,जिल्हाअध्यक्ष संजय कापसे,शेतकरी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील,विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्पनिल गायकवाड,शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे ,शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष सचिन नागमोती,दिपक देशमुख,उद्देश शिंदे ,परमेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.