जळगाव (प्रतिनिधी) -हरित लवाद यांच्याकडील दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार covid-19 विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत दिवाळीच्या कालावधीत रात्री 8 ते 10 च्या वेळेतच फटाके फोडता येईल. तसेच राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडील आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्ती या आगामी येणाऱ्या क्रिसमस व नववर्षाचे स्वागत या उत्सवांना देखील लागू राहतील व याबाबतच्या वेळा स्वतंत्र्य कळविण्यात येतील असे आदेश आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.
सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पत्र दिनांक 14 मार्च 2020 अन्वय कोरोना विषाणू covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सात रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा लागू करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व जळगाव महानगर पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रदान करण्यात येत आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भावी भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र आहे सदरचा आदेश आज दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.