जळगाव, (प्रतिनिधी) – पारोळा येथे युवतीवर अत्याचार करून विष पाजून ठार मारल्याची घटना घडल्यानंतर भाजपच्या खा.रक्षाताई खडसे यांनी जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपलेला आहे का? अजून किती बलात्कार होणार? सदर आरोपींना फाशी द्या. लवकर कडक कायदा बनवा, अजून किती वाट बघणार… असं ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे घटना..
पारोळा तालुक्यातील शहरात 20 वर्षीय युवतीचे अपहरण करून तिला कासोदा येथे नेत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जबरदस्ती विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. जबर जखमी असलेल्या तरुणीला बसस्थानकाच्या मागे फेकून नराधमांनी क्रूर कृत्य केले. उपचारादरम्यान मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी अखेर मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटने प्रकरणी खा.रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना ट्विटर ला टॅग करत ट्विट करून जाब विचारला आहे.