चाळीसगावात -(किशोर शेवरे) तालुक्यात
यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतला असून शासनाने वेळेवर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केली असती तर शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विक्री करावा लागला नसता. मात्र शेतकऱ्यांप्रती शासनाचे उदासीन धोरण असल्यामुळे व्यापाऱ्यांचे साधते आणि शेतकऱ्यांचे जर वर्षी आर्थिक नुकसान होत असते . शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळावा यासाठी चाळीसगाव तालुक्यात राज्य सरकारने शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे यासाठी दि ११ रोजी मुख्यमंत्री यांना तहसीलदार चाळीसगाव यांच्या मार्फत रयत सेनेने निवेदना द्वारे मागणी केली आहे .
शेतकऱ्यांना एकीकडे शेतात मजूर मिळत नाही . म्हणून शेतात राबराबुन शेतकरी पिक घेतो दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे दिवाळी सणामुळे कापूस कमी भावाने शेतकऱ्यांना विक्री करावा लागत आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने राज्य शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासना प्रति कमालीची नाराजी आहे. चाळीसगाव तालुक्यात जास्तीत जास्त जिनिंग सुरू करण्यासाठी पणन विभागाला आपल्या स्तरावरून आदेश देऊन शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येईल व दिवाळी हा सण शेतकऱ्यांना उत्साहात साजरा करता येईल. यासाठी चाळीसगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावी. असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसिलदार यांच्या मार्फत दि ११ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदणाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,शेतकरी सेनेचे तालुका अधक्ष देवेंद्र पाटील ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, शहराध्यक्ष योगेश पाटील, तुषार देशमुख ,भैय्यासाहेब पाटील, मंगेश देठे, सागर चव्हाण, अनिल जाधव, दीपक देशमुख ,योगेश पाटील ,बाळकृष्ण नाडर ,संजय पाटील ,शांतीलाल निकुंभ ,सोमनाथ पाटील आदींच्या सह्या आहेत