जळगाव, (प्रतिनिधी)- मुक्ताईनगर तालुक्यातील दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या सभेत फडणवीसांवर टीका करतांना मी मुख्यमंत्री पद ब्राम्हणाला दिलं असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं यामुळे वादंग निर्माण होऊन ब्राम्हण समजतून नाराजी व्यक्त होतं असतांना आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून दिलगीरी व्यक्त केली.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. एकनाथ खडसे यांनी याप्रकरणावर दिलगीरी व्यक्त करत समाजाप्रती आदर असल्याचेही म्हटले आहे.