जळगाव (प्रतिनिधी) – येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात ई – चलन घोटाळा उघडकीस आला असून यात लिपिक एजंट व मालक यांनी बनावट दस्तावेज तयार करून वाहनांचा दंडाची दोन लाख ३८ हजार शंभर रुपयांची रक्कम सरकारी भरणा न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे उघडकीस आल्याने याप्रकरणी लिपिक नागेश पाटील यांच्यासह ३५ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वरिष्ठ लिपिक प्रकाश रामराव पवार यांनी फिर्याद दिली आहे.
सविस्तर असे की, सप्टेंबर २०१९ मध्ये नागेश पाटील हे खटला विभागात लिपिक म्हणून कार्यरत असताना वायुवेग पथकाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत महाजन यांनी रस्त्यावरील वाहन तपासणी दरम्यान मंसूर खान मेहबूब खान राहणार भुसावळ यांचे वाहन क्रमांक एमएच १९ बीएम ५९९५ अडविले होते. कागदपत्र तपासणी विमा योग्यता प्रमाणपत्र व वाहन कर नसल्याने हे एसटी वर्कशॉप मध्ये जमा केले होते. वाहनास कनिष्ठ लिपिक नागेश पाटील यांनी वाहन मालकाचे संगनमत करून ‘कॅश ऑन रोड’ या पद्धतीचा अधिकार नसताना वापर केला तसेच १९ सप्टेंबर २०१९ रोजी तीन हजार शंभर रुपये ई चलन प्रणाली भरल्याचे खोटे भासवून उपप्रादेशिक अधिकारी म्हणून बनावट, खोटी स्वाक्षरी करून २७ सप्टेंबर २०१९ रोजी परस्पर वाहन सोडण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी उपप्रादेशिक कार्यालयाने यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयाकडे गुन्हा दाखल व कारवाई करण्याची शिफारस करण्या बाबत पत्रव्यवहार केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून कारवाई प्रलंबित होत असल्याची ओरड होती. अखेर काल रात्री अखेर गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्ह्यात यांची आहेत नावे…
कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील, सुलतान बेग मिर्झा, गणेश कौतिक ढेंगे, वाहनमालक मंसूर खान मेहबूब खान समाधान भागवत पाटील भरत हिंमत चौधरी एकनाथ पांडे फकीर शहारुख शहा खालील शहा तो प्रबंधन ऑटो जगदीश काशिनाथ माळी अजित खान बशीर खान शिकलगर ए मशरिफ मोरया खूप भगवान सूर्यकांत गोवा कोळी आकाश नामदेव कोळी प्रवीण वेंकटेश खोडे कैलास नारायण पाटील सचिन सोमनाथ सरदार शिवराम जय राम माळी विशाल नामदेव मुसळे वासुदेव ज्ञानेश्वर बोबडे रमेश जास्तच बंगाळे मोतीलाल सदस्य दीक्षित विनोद प्रल्हाद बडगुजर सुनील सुखदेव डे बापू आनंदा पाटील विजयसिंह महाजन एम एच झिरो चार 368 मालक शेख नजीर शेख अहमद कुरेशी उदय बराटे शेख सागर नाशिक राजेश बाबुराव वागळे संदीप प्रभाकर कोळी सुनील मोतीराम बाविस्कर सहित शेख रहीम पोपट शेख सत्यजित पाटील सुलतान बेग मिर्झा गणेश कौतिक ढेंगे आनंदा पाटील गाढे, विजयसिंह महाजन, वाहन मालक शेख नजीर शेख अहमद कुरेशी, उदय बऱ्हाटे, शेख सागीर नासीर, वाहन मालक राजेश बाबुराव वागळे, संदीप प्रभाकर कोळी, सुनील मोतीराम बाविस्कर, मो.सहिद शेख रहीम, पोपट बंशी शेख, वाहन मालक सत्यजित साबळे, भूपेंद्र बेलदार, यांची नावे आहेत.