लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 14 टक्के मतदान हे आमचे यशच
मुंबई – काँग्रेसचे राज्यात सुपडे साफ झाले असून काँग्रेसच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले असून काँग्रेसच्या अपयशाला वंचित बहुजन आघाडी जबाबदार नसून काँग्रेस स्वतः आहे असे वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो बाळासाहेब आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
एव्हिएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज
ईव्हीएम हे टेकनॉलॉजि आहे त्यात फेरफार करता येउ शकते त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदान मतपत्रिकेने होण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन उभे करण्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी बोलत होते.