पाचोरा, – पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कुल पाचोरा येथे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.एन.आर.ठाकरे व श्री. ए.बी.अहिरे यांची नुकतीच विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी नियुक्ती झाली. त्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन संजय वाघ व शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख एम.बी.बाविस्कर, कार्यालय प्रमुख ए.बी.सिनकर उपस्थित होते.
सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी नवनियुक्त पर्यवेक्षक यांचे अभिनंदन केले आहे.