मुंबई, – दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी शासनाने आज दिनांक ५ रोजी परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोव्हीड १९ (covid-19)मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दीपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने राज्य शासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत चालू वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दीपावली उत्सव पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाही त्यामुळे साजरा केला जाणारा दीपावली उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी, उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे तसेच नागरिकांनी गर्दी काढावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन नये, माक्सचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, जेणेकरून करून संसर्ग पण वाढणार नाही दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणिमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सव नंतर बराच कालावधी पर्यंत दिसून येतात पूर्ण आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. हे विचारात घेऊन नागरिकांनीच चालू वर्षी फटाके फोडण्याची टाळावे त्याचा त्रास होऊ शकतो त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करूनच दिवाळी उत्सव साजरा करावा या उत्सवा दरम्यान कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उपक्रम कार्यक्रम उदाहरणार्थ दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नये आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक माध्यमाद्वारे त्याचे प्रसारण करावे, सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम आयोजित आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे उदाहरणार्थ रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.कोरोना covid-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका पोलिस स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानुसार व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्या याचे देखील अनुपालन करावे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. र राज्यपाल यांच्या आदेशान्वये उपसचिव महाराष्ट्र शासन संजय केळकर यांच्या स्वाक्षरीने सदर आदेश पारित करण्यात आले आहेत.