पाचोरा, (प्रतिनिधी)- नाशिक येथिल आस्था अनघादि फाऊंडेशन हि सामाजिक संस्था नेहमीच नवनविन उपक्रम राबवत आसते आज दिनांक 4 रोजी,त्रंबकेश्वर येथील खम्बाळेवस्ती वर जाऊन पूर्व दिवाळी भेटवस्तु देऊन व कोविड जनजागृती करत, कोविड-19 च्या कारणामुळे गेली आठ महिने मुलं घरीच आहैत. म्हणून विरंगुळा मिळावा यासाठी लहान मुलांना चित्रकला वही,रंग पेटी,दिवाळी भेट वस्तु तसेच फराळ देऊन.मुलांना आनंद दिला. Covid-19 बद्दल माहिती देऊन त्यांना मास्क वाटुन मास्क कसा वापरावं ते सांगितले, त्याच बरोबर हाताची स्वच्छता, सामायिक अंतर, व शरीराची स्वच्छता कशी करावी हे सांगितले. दिवाळी भेट देऊन मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.असे, संस्थे च्या अध्यक्षा वैशाली बापुराव चव्हाण यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, अजुन आमची ही संस्था विविध उपक्रम घेऊन, शासनाला, समाजाला उपयुक्त होणारे उपक्रम राबविणार आहै.या उपक्रमात उपस्थित असलेले सदस्य होते. श्री.महेश शेवरे,श्री. किशोर ईशी, सौ. राखी ईशी, अनघा सैन्दाणे,आदित्यवर्धन सैन्दाणे व आदी.