जामनेर/जळगाव ,दि.३ :जामनेर तालुक्यातील दोनशे भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश झाल्याचे माहिती मिळाली.. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते हे भाजपाचे नसल्याचा साफ इन्कार भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ‘नजरकैद’ शी बोलतांना केला.
पुढे बोलतांना चंद्रकांत बाविस्कर म्हणाले की, पक्षात फक्त कामगिरी दिसावी म्हणून घडवून आणलेले हे ‘महानाट्य’ आहे.
तालुक्यातील देवपिंप्री आणि नेरी येथील २०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि असं दाखवण्यात आलं की भाजपाला जामनेर तालुक्याला खिंडार पडले परंतु हे सत्य नाही हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे हास्यास्पद कृत्य वाटतं.
आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या पैकी भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अथवा भारतीय जनता पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य तरी होते का? तसेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य सुद्धा या मंडळींपैकी कोणीच नव्हते ना कोणी बूथ प्रमुख होता.त्यामुळं भाजपाचा कोणताही कार्यकर्ता पक्ष सोडून गेलेला नाही तालुक्यात कुठेच खिंडार पडलेली नाही सगळे कार्यकर्ते आहे तिथेच असल्याचा खुलासा भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केला.