जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्हा पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे,गेल्या सहा महिन्यापासून जळगाव “कोरोना संसर्गजन्य कक्ष” येथे कर्तव्य पार पाडत आहे. मार्च – एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाची जगभरात प्रचंड भीती होती, मृत्यू म्हणजे कोरोना आणि कोरोना म्हणजे मृत्यू हाच समज समाजामध्ये निर्माण झाला होता. आणि त्याला पोलीस देखील अपवाद नव्हते. आणि याच पार्श्वभूमीवर श्री अहिरे यांना जळगाव सिविल हॉस्पिटल मधील “कोरोना संसर्गजन्य कक्ष” येथे गार्ड ड्युटी चे कर्तव्य देण्यात आले होते. सदरची ड्युटी करीत असताना अहिरे, यांना ज्या वेदना झाल्या, ज्या त्यांच्या भावना होत्या. असे त्यांना एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या कोरोना कक्षातील 21 दिवसांच्या अनुभवांचे “कोरोना योद्धांच्या वेदनेचे १६ मे ला देशातील पहिले पुस्तक ‘मृत्यू घराचा पहारा’ या नावाने लिहून काढले. त्याचबरोबर आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन देखील मुख्यमंत्री निधीत (कोविंड रिलीफ फंड) मध्ये दिलेले आहे.
दि. ०१/११/२०२० अमळनेर येथील पोलीस वसाहत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस नाईक विनोद अहिरे,यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, श्री अनिल देशमुख यांना आपल्या स्वलिखित ‘मृत्यू घराचा पहारा’ या पुस्तकाची प्रत सन्मानाने भेट दिली सदर पुस्तक भेटेप्रसंगी गृहमंत्र्यांनी विनोद अहिरे यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाली दिली आणि यापुढे देखील निर्भीडपणे कर्तव्य पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
आणि आज दस्तुरखुद गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘मृत्यू कार’ पोलीस विनोद अहिरे, यांच्या पाठीवर शाबासकी थांप देतांना चा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोड केला आहे. त्यामुळे नक्कीच जळगाव जिल्हा पोलिस दलामध्ये ही अभिमानाची बाब आहे. विनोद अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता ते आमच्या प्रतिनिधींना म्हणाले की याचं सर्व श्रेय पोलीस अधीक्षक मा. प्रवीण मुंडे साहेबांना जाते कारण मुंडे साहेबांनीच मला सदर कार्यक्रमात गृहमंत्री महोदयांना पुस्तक भेट देण्याची संधी दिली होती.
विनोद अहिरे यांना आमच्याकडून देखील त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा