जळगाव-
‘तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’…
‘नका सोडून जाऊ रंग महाल’…
या गाण्याच्या ओळीप्रमाणे मुजरा होत असलेला रंग महाल न सोडता मुजऱ्याच्या मोहात तुडुंब डुबणारे जिल्ह्यातील सहकार महर्षी म्हणविणाऱ्या एका आंबट शौकीन सहकार नेत्याचा मुजरा पाहतांना तसेच “आइटम गर्ल” चे फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये काढतानाचे काही फोटो हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्यातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेवर सदर नेता संचालक असून या फोटो मध्ये सदर नेता एसी दालनात मुजरा पहाण्यात तल्लीन झालेला दिसत आहे.तर त्या मुजरा करणाऱ्या “आयटम गर्ल” चे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढतांना दिसत आहे.जिल्ह्यातीलसर्वात मोठ्या एका सहकारी सोसायटी अध्यक्ष निवडीच्या जल्लोष करण्यासाठी सदर ‘मुजरा पाहणीचा बेत’ असल्याचे समजते. या घटनेमुळे जळगावात मोठा एका सहकार नेत्याचा “मुजरा कांड” समोर आले आहे.त्या सहकार नेत्या सोबत आणखी काही जण देखील होते.या बाबत सविस्तर पुढील भागात वाचालच. या मुजरा प्रकरणात अनेक सहकार व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज असल्याचे कळते.