जळगाव,(प्रतिनिधी) – संपूर्ण राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळेच ते राजीनामे देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. नुकतेच नगरमध्ये भाजपच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपा पक्षातील धूसफूस बाहेर आली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे आज सकाळी जळगाव येथील त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना नगर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केली असता, एकनाथ खडसे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत.