बॉलिवूडचा जगताचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानचा आज २ नोव्हेंबर रोजी ५४ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी शाहरुख च्या निवास्थान असलेल्या ‘मन्नत’ समोर हजारोच्या संख्येने चाहते शुभेच्छा देण्यासाठी येत असतात तर सर्वच क्षेत्रातून शाहरुख वर वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव होतांना दिसत आहे.
अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दिक्षित ने शाहरुख ला ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या असून लवकरच भेटण्याची आशा ही व्यक्त केली आहे.
माधुरी दिक्षितने ट्विट करुन म्हटलं आहे की, ” जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो, तेथे मस्ती, जादू आणि प्रेम असते. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे. सुरक्षित रहा आणि लवकरच भेटण्याची आशा आहे.