जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे आज शिरपूर जात असतांना वाटेत विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी, समर्थकांनी स्वागत केले.
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक अनेक ठिकाणी उत्साहात सत्कार करत आहे. ज्या दिवशी मुबंईत खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता त्याच्या दुसऱ्या दिवस खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे जळगाव कडे यायला निघाल्यावर अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला होतो.