जळगाव, दि. 31 : महाकाव्य ‘रामायण’चे रचनाकार महर्षि वाल्मिकी जयंती, देशाचे पहिले उपपंतप्रधान, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवस व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000