जळगाव, (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील गुटख्याचा ट्रक प्रकरण पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या सात कर्मचाऱ्यांसह मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी ही कारवाई करत याबाबतचे आदेश काढले.
चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी गुटखा ट्रकचा पाठलाग करून लाखोंचा गुटखा पकडून दिला होता. याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेऊन केला होता.पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी चौकशी होऊन कारवाईची मागणी केली होती.