पाचोरा, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष रवींद्र (जीभाऊ) पाटील यांनी पाचोरा येथे त्वरित कापुस खरेदी केंद्र सुरु करावे असे निवेदन आज उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन दिले.कापुस खरेदी केंद्र शासन लवकर सुरू न केल्यामुळे शेतकर्याकडे जो कापुस आलेला आहे.तो कमी भावाने नाईजास्तव व्यापारी ना बेभाव विकावा लागत असुन शेतकर्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन तरी शासनाने वेळेवर कापुस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष व पदाअधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शेतकर्याची आर्थिक पिळवणुक थांबावी आणि शासनाने लवकरात लवकर कापुस केंद्र सुरु करून शेतकर्याचे नुकसानापासुन वाचवावे.
शासनाने कापुस खरेदी केंद्र सुरु न केल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन व्यापारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत! कापुस केंद्र तातडीने सुरु करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडला शेतकर्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल.
निवेदन देताना अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा, शहर अध्यक्ष सुरेश शिंदे उपशहराध्यक्ष सचिन पाटील उपतालुकाध्यक्ष संजय राठोड ‘सदस्य गोपाल पाटील, अमरसिंग पाटील, निकील पाटील, तसेच तालुका कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील, विजय जाधव आदी उपस्थित होते.