एकनाथ खडसेंनी वेदना व्यक्त करत अखेर भाजपाच्या सदस्यत्वचा आज राजीनामा दिला
गेल्या चार वर्षांपासून राजकीय वनवास भोगत असलेले एकनाथ खडसे यांनी अखेर आज थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी असल्याची तोफ डागत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं जाहीर करत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.यामुळे भाजपाला उत्तर महाराष्ट्रात मोठे नुकसान होईल असं चित्र आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात असल्याची चर्चा सुरु होती त्या चर्चांना आज अखेर विराम मिळाला मात्र खडसेंनी मनातील खदखद व्यक्त करत अखेर भाजपाला सोडचिट्ठी दिली. राजीनामा निव्वळ देवेंद्र फडणवीसांच्यांचं छळामुळे दिला असल्याचे खुलासा त्यांनी यावेळी केला.
आधी राष्ट्रवादीत… मग महाविकास आघाडीत
पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले की, आधी राष्ट्रवादीत.. मग महाविकास आघाडीत जाणार या सूचक वक्तव्यावरून एकनाथ खडसेंचे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकार मध्ये स्थान निश्चित मानलं जात आहेत.