जळगाव, (प्रतिनिधी)– नाथाभाऊ आमचे नेते आहेत…ते पक्ष सोडून जाणार नाही… मला झोपेतून उठवून जरी विचारलं तरी मी हेच सांगेन… अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ‘नजरकैद’ शी बोलतांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकाश्र करणारं ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं… आणि तेच रिट्विट भाजपाचे नाराज नेते एकनाथराव खडसे यांनी करून एकप्रकारे जयंत पाटील यांच्या टिकाश्रला पाठिंबा दिल्याने खडसे भाजपा पक्ष सोडतील का याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना विचारलं असता ते बोलत होते.