कर्जत/लोभेवाडी/, (मोतीराम पादिर) –कर्जत तालुक्यात बहुसंख्य लोक हे आदिवासी समाजाचे राहतात या लोकांचे उपजीविकेचे साधन शेती आहे.कर्जत तालुक्यात सतत दोन तीन दिवस पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यानि कापलेली भातशेती आणि शेतात असलेले भात हे पूर्ण जमिनीवर पडून मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपतीने हिरावल्याने आदिवासी शेतकरी पुरता हवालदील झाला आहे.
अवकाळी पाऊस आणि वादळामूळे कर्जत तालुक्यातील विविध वाडयांना भात पिकाचे खुप नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामा करून त्यांना त्वरीत मदत मिळावी म्हणून आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जतच्या वतीने मांगणी करण्यात आली आहे.
आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जतच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष भरत शिद. रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मालू निरगुडा. कर्जत संघटना उपअध्यक्ष परशुराम दरवडा. उपअध्यक्ष मंगळ केवारी संघटनेचे सचिव मोतीराम पादिर. मा.आध्यक्ष जैतू पारधी. प्रकाश केवारी. शिवाजी सांबरी.आदिवासी संघटनेचे पदाधिकारी. आणि कार्यकर्ते उपस्थित होते.