जळगाव : जळगाव शहरात अत्याधुनिक सेवा व शासकीय दरानुसार व नियमानुसार श्री दत्त कोव्हिड हॉस्पिटल अॅण्ड क्रीटीकल केअर सेंटर हे नवीन कोव्हिड रुग्णालयाचा प्रारंभ झालेला असून शहर व जिल्हावासियांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार व नियमानुसार श्री दत्त कोव्हिड हॉस्पिटल अॅण्ड क्रीटीकल केअर सेंटरचा शुभारंभ दि. 17 ऑक्टोबर 2020 पासून घटस्थापनेच्या दिवशी झालेला असून हे रुग्णालय आकाशवाणी, सिंधी कॉलनी रोड, युनियन बँके समोर आहे. रुग्णालयात 35 बेड उपलब्ध असून सर्वांना ऑक्सिजनची सुविधा आहे. यात 5 बेड हे आयसीयुचे असून त्यांना बायपॅप व एनआयव्ही सुविधाही उपलब्ध आहे. चोविसतास तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाच्या निगराणीत सेंट्रल मॉनिटरींग सिस्टम द्वारे रुग्णसेवा सुरु झालेली आहे. सुसज्ज व स्वच्छ निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या रुग्णालयात रुग्णांसाठी मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यानयोग व प्राणायम आदिचीही व्यवस्था आहे पौष्टिक नाश्ता व जेवणाची व्यवस्था सुद्धा याठिकाणी करण्यात आलेली असून नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संजय महाजन, डॉ. शिरीष गर्गे यांनी केले आहे.