रावेर- शहर पासून रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निघृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार आज दि १६ राजी सकाळी उघडकीस आला .या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे .यात मुलींचा समावेश आहे .सदर घडलेल्या घटनेने संपूर्ण रावेर तालुका हादरलेला असून भयंकर निर्घृण हत्येने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .
दरम्यान रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी या ठिकाणी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली व लवकरात लवकर या मारेकऱ्यांना पकडण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, फैजपूर उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पं.स.सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, प.स.सदस्य पी.के.महाजन, हरलाल कोळी, संदीप सावळे, अंकुश चौधरी, शुभम पाटील, वासुदेव नरवाडे, सुनील काटे, राहुल पाटील, किरण नेमाडे, कैलास पारधी,आसिफ पिंजारी, लखन पाटील, पंकज चौधरी, परमेश्वर सोनार