रावेर – शहर पासून रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निघृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार आज दि १६ राजी सकाळी उघडकीस आला .या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे .यात दोन मुलींचा समावेश आहे .सदर घडलेल्या घटनेने संपूर्ण रावेर तालुका हादरलेला असून भयंकर निर्घृण हत्येने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली व जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्तांना भ्रमाणध्वनिवरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने तपासाची चक्रे फिरवून खुनाचा छडा लावावा अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत .
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , रावेर शहरालगत काही अंतरावरील बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या काही वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत शेतात राहतात .मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात .त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते .दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते .चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली . दि १६ रोजी सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले .घरात डोकावून पाहिले असता .चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला . घरात गाढ झोपलेल्या कु.सविता ( वय १४ ) , राहुल ( वय ११ ) , अनिल ( वय ८ ) व नाणी ( वय ५ वर्षे ) या चौघा जणांची हत्या झाली.
हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली .मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे .
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे . यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे , सपोनि शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे . नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकले नाही .
जळगाव येथून श्वान पथकाला करण्यात आलेले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील दिली सांत्वनपर भेट
दरम्यान , चौघांच्या हत्या प्रकरणाने रावेर तालुक्यात हाहाकार उडाला असून घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळा कडे धाव घेतली व कुटुंबियांचे सांत्वन केले .तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत घटनेचा तपास तातडीने करण्याच्या सूचना केल्या तसेच मृतकांच्या वारसांना शासनाकडून मदत मिळण्याकामी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, रावेर तालुका प्रमुख योगीराज पाटील यांची उपस्थिती होती .