एरंडोल, (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत गालापूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर आदिवासी वस्तीवर वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन हसत-खेळत वाचनाचे महत्त्व पटवून देण्याविषयी शिक्षक दाम्पत्य किशोर पाटील कुंझरकर(आदिवासी वस्ती शाळा गाला पुर) व जयश्री पुरुषोत्तम पाटील (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गाला पुर)यांनी पुढाकार घेतला.विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन हसत खेळत आनंददायी प्रयोगातून त्यांनी विद्यार्थ्याना वाचनाचे आणि हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले.कठीण अशा कोरोना काळात या शिक्षक दाम्पत्याचा त्यांचा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा शिक्षणात खंड पडू न देण्याचा प्रयोग राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरत आहे. हसत-खेळत वाचन प्रेरणा दिन साजरा करताना राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आत्मसमृद्ध समाज निर्मितीसाठी युवक विद्यार्थी व सर्वांनीच वाचन प्रेरणेची कास धरणे आवश्यक असल्याचे म्हटले. आदिवासीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूर येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त विद्यार्थी व पालकांची संवाद साधताना आरोग्य स्वच्छता व बेटी बचाव बेटी पढाव चे महत्वही त्यांनी विशद केले. घरोघरी जाऊन मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथील शिक्षिका जयश्री पाटीलयांनी गोष्टीच्या पुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या अंगणातच विद्यार्थ्यांचे वाचन करून घेत वाचन संस्कृती साठी सर्वांनी वाचनाची कास धरावी असे आवाहन केले.विद्यार्थ्यांचे गोल रिंगण करून मनोरंजनात्मक वाचन भाषिक खेळ घेतले. त्यांनी खेळातून वाचनाचे महत्व सांगितले. हात धुण्याचे जीवनातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व सांगून कोरोना सारख्या कठीण काळात सर्वांनाच हात धुण्याच आपोआपच निसर्गान शिकवले असे म्हटले. तसेच आज शाळा सिद्धि कार्यक्रम अधिकारी आसिफ शेख साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय संध्याकाळी सात ते आठ शिक्षण संवाद राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून यात परभणी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर झिरो बजेट हँडवॉश स्टेशन बाबतमार्गदर्शन करणार असल्याची माहिती दिली. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील , सुनील आप्पा भिल सखाराम सोनवणे सुभाष दादा भील, रेखाताई भिल, आरिफ दादा शेख, ग्राम विकास अधिकारी आर एम पवार, केंद्रप्रमुख सुनील महाजन आदी मान्यवरांसह पालक दोन्ही शाळांची शाळा व्यवस्थापन समिती सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील, गटविकास अधिकारी बी एस अकलाडे, डायट चे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे उपशिक्षणाधिकारी विजय पवार ,आदींनी आदिवासी वस्ती वरील या उपक्रमाचे सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले.