कुलाबा – चर्चिल चेंबर इमारतीच्या तीसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. कुल्याबातील ताज महाल हॉटेलजवळच्या ‘चर्चिल चेंबर’ या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. आगीचे नेमके आणि अधिकृत कारण कळू शकलेले नाही.