मुंबई, राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे 15 ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले.
राज्यात कोविड च्या वाढत्या प्रादुर्भावाने शासनाने दिवाळी नंतर शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात या बाबत चर्चा झाल्याने सध्या तरी ऑक्टोबर मध्ये शाळा सुरु होणार नाही असे चिन्ह आहेत.