जळगाव – शहरापासून शिवाजी नगर व अनेक गावांना जोडणारा शिवाजी नगर उड्डाणपूल बांधण्याच्या विकासकामास भाजपच्या कार्यकाळात मंजुरी घेण्यात येउन प्रत्यक्ष काम सुरु झाले असून सदर काम प्रगतीपथावर असून त्या कामाची पाहणी आज सकाळी ११.०० वा. आमदार चंदूभाई पटेल, आमदार राजूमामा भोळे, शिवाजी नगर मंडल अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र मराठे केली.
तसेच सदर बांधकाम अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना आमदार चंदूभाई पटेल यांनी केल्या. तसेच कंत्राटदार यांचेकडून पुढील कामाच्या नियोजनाची माहिती जाणून घेतली.