Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

najarkaid live by najarkaid live
September 28, 2020
in जळगाव
0
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (जिमाका) दि. २८ – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधा तयार होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला लवकरच यश मिळेल. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले.

सदा ग्यान फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कोविड रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या ऑक्सीजनयुक्त बेडच्या वाढीव वॉर्डाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ बी एन पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, नगरसेवक विष्णू भंगाळे, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षा अपर्णा भट, सचिव जितेंद्र बरडे, चेअरमन महेंद्र रायसोनी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की,
जिल्ह्यात पूर्वी कोरोनाचे स्वॅब तपासणीसाठी लॅब नव्हती. राज्य शासनाकडे याचा मी सतत पाठपुरावा केल्याने टेस्टीग लॅब जिल्ह्याला मिळाली. अन्यथा पूर्वी चार ते आठ दिवसानंतर येणारे अहवालाच्या तक्रारी, रुग्णांच्या तक्रारी, आरोग्य सुविधांची वानवा असे अनेक प्रश्‍न होते. ते प्रश्‍न या लॅबमुळे निकाली निघाले. आता जिल्ह्यात आपली स्वतःची टेस्टींग लॅब आहे, जिल्ह्यात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, व्हेटींलेटर याची उपलब्धता आहे. यामुळे कोरोना बाधीतांवर त्वरीत अत्याधूनिक प्रकारचे उपचार होत आहे. आता कोरोना बाधीतांचा मृत्यूदरही खाली आला आहे. यामुळे जिल्हा सुविधांबाबत राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयाचाही पुढे गेला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यास जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राबविलेल्या ‘बेड साईड असिस्टंट’ पॅटर्नची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत कौतुक केले आहे. सोबतच सर्व विभागाच्या यंत्रणेने रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्ह्यात कोरेाना बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, मृत्यूदरही खाली येत आहे. जिल्ह्यास प्राप्त झालेल्या विविध निधीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर भर दिल्याने मुंबईच्या रुग्णालयांबरोबरीच्या सुविधा जळगावला मिळत आहे. सामाजीक संघटनांनी केलेल्या सहकार्य व अधिकाऱ्यांच्या
कार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळातही सामाजिक संस्थांनी आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले की, आगामी काळासाठी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी पुढील काळातील दुर्गात्सवासह येणारे सण, उत्सव भाविकांनी, नागरिकांनी सोशल डिस्टनींगचे पालन करीत साधेपणाने साजरे करावेत. सर्वांनी कोरोनाबाबत काळजी घेताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असून आता जिल्ह्यात अगदी दर २५ किमीवर ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगत आगामी नवरात्रोत्सव व दिवाळीत काळजी घ्या, नियम पाळा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले़. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़. चव्हाण यांनी जिल्हाभराचा ऑक्सिजन बेडचा आढावा मांडला़. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी कोविड रुग्णालयात झालेल्या बदलांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख महेंद्र रायसोनी यांनी केले़

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वीज प्रश्नासंदर्भात आ. किशोरअप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

Next Post

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा

नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us