जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी पत्रकार मिलिंद लोखंडे यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी दि. 25 सप्टेंबर रोजी दिले आहे.
पत्रकार मिलिंद लोखंडे हे गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके,नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, संजय तांबे, सुनील भोळे, संतोष ढिवरे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे,अभिजित पाटील, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.