तांदुळवाडी ता.भडगांव (वार्ताहार) येथील कोरोनाच्या संक्रमनामूळे यंदा दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही; मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून भडगाव तालूका युवा परिषदेने फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परिक्षेत तालूक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या अशा १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला,
फिजीकल डिस्ट्न्स पाळुन हा कार्यक्रम घेण्यात आला,
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल व सरस्वती मातेच्या प्रतिमेच पूजन व माल्यार्पण करून झाली,
तालुकाध्यक्ष स्वप्निल निकम यांनी प्रास्ताविक करुन पाहूण्यांचा परिचय करुन दिला व यूवा परिषदेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर होते,
प्रमूख पाहुणे म्हणून भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे, युवा उद्योजक समिर जैन, युवा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा पाटील, उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, मुख्य सचिव दिव्या भोसले, सचिव आकाश धनगर, अमळनेर तालूका मुख्य सचिव योगेश कोळी आदी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर तालूका पदाधिका-यांनी उपस्थित मान्यवरांचे वृक्ष व वैचारिक पुस्तके देऊन स्वागत केले,
कार्यक्रमात दहावी व बारावीत यश संपादन केलेल्या प्राची गिरासे, गुंजन पाटील, सलोनी सावंत, सारंग पाटील, निरंजन पाटील, समिधा बोरसे, वेदांत पाटील, चेतना पाटील, मनदीप बेनाडे, पठान अर्शिया, सुचिता भावसार, कविता ह्याळींगे, प्रतीक्षा वाल्हे, जानवी मेहता, मोनाली पाटील, निकिता पाटील, पियुष पाटील, अशोक बारेला या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला,
कार्यक्रम यशस्वितेसाठी तालूकाध्यक्ष स्वप्निल निकम, उपाध्यक्ष निलेश नेरकर, सचिव शुभम रणदिवे, जयेश सोनार, मयुर पाटील यांनी परिश्रम घेतले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक पाटील यांनी केले,
कार्यक्रमाची सांगता आदर्श कन्या विद्यालयात वृक्षरोपण करुन झाली.