पाचोरा, (प्रतिनिधी) – श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथि कोरोना माहामारीचे भान राखुन समाजाने आज घरोघरी साजरी केली.
संत सावता महाराज पुण्यतिथि निमित्ताने १३/०७/२०२० पासुन ते १९/०७/२०२० पर्यंत सावाता महाराज जीवन चरित्र पोथी वाचन अखंड हरिनाम सप्ताहाची मांडणी करुन आज रोजी समाप्ती करण्यात आली. तसेच सावता महाराजांची आरती व प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम माळी समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) सहपत्नीक सौ.बेबाबाई विठ्ठल महाजन यांच्या हस्ते सावता महाराज सदन बाहेरपुरा परधाडे रोड पाचोरा निवस्थानी करण्यात आले.