वरणगाव ता. भुसावळ : – सकाळी पाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाºया महिलेच्या गळ्यातून आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविल्याची घटना आज येथे घडल्याने महिला वर्गात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि , वरणगाव शहरातील मच्छिंद्रनगर भागात राहणाºया सपना रमेश बोंडे या महिला महात्मा गांधी विद्यालयाजवळ आल्या असता दुचाकीवर दोन जण त्यांच्यासमोर आले. आम्हाला दीपनगरला जायचे आहे असे सांगून लक्ष विचलित होण्याअगोदर दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून वेगाने फरार झाले . याबाबत पोलिसांत गुन्हा उशिरापर्यंत नोंद झाला नसल्याचे कळते .