जळगाव- के.सी.ई. सोसायटीच्या व मुळजी जेठा महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व जनसंवाद आणि पत्रकरिता विभाग, मुळजी जेठा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्ममाने शनिवार दि. २० रोजी दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तसेच मा.मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांचे ‘प्रभावी जनसंपर्क आणि त्याचे आयाम’ या विषयावर व्याख्यान मुळजी जेठा महाविद्यालयाच्या नवा कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा आहे. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. हि संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात जाणून घेता यावी यासाठी या व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी के. सी. ई. सोसायटीचे सहसचिव अँड़.पी.एन.पाटील हे असतील .तर या कार्यक्रमासाठी उपस्थितीचे आवाहन प्राचार्य ए.आर.राणे, प्राचार्य डॉ उदय कुलकर्णी यांनी केले आहे .