वरणगावं(प्रतिनिधी):-वरणगाव शहरात व परिसरात कोरोना या महामारीत सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीजबिल आलेले आहे सर्व सामान्य नागरिकांना 20 हजारांहून अधिक वाढीव वीज बिले आल्याने नागरिक प्रचंड हैराण झालेले आहे वाढीव वीज बिल माफ करावे तसेच जनहिताच्या समस्याघेउन आज वरणगाव येथे वीजमंडळा च्या कार्यलयाय समोर वीज बिलाची होळी करण्यात आली या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपा नेतेसुनील माळी हाजी अल्लउद्दीन सेठ शामराव धनगर रमेश पालवे हितेश चौधरी विवेक शिवरामे शंकर पवार संजय सोनार डी के खाटीक गोलू राणे नटराज चौधरी आकाश निमकर किरण वंजारी अतुल बावणे राहूल जंजाळे अनिकेत चांदखेडकर राकेश लोहार जय चांदणे अनिल कुसूमंबे यांच्या सह असंख्य नागरिक उपस्तिथ होते यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की वरणगाव शरातील परिसरातील नागरिकांचे आलेले वाढीव वीज बिल माफ करावे , वारंवार अवेळी शहरात वीज खंडित केली जाते वीज सुरळीत करण्यात यावी वीज मंडळ कार्यलयात फोनवर कायम कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी तसेच रेल्वे स्टेशन ते बस स्टँड चौक दरम्यान डी पी डी सी अंतर्गत 35 लाख रुपयांचे वीज पोल शिपटींग चे काम मंजूर झालेले आहे ते वीज पोल शिपटींग करण्यात यावे शेतकऱयांच्या शेतात वीज तार कापून चोर नेत आहे त्यावर वीज तार नवीन टाकण्यात यावे नागेशवर ते पाणी पुरवठा योजने पर्यन्त डीपी डी सी तुन वीजपोल टाकलेले आहे ते काढू नये आणि बंद केलेला वीज पुरवठा सुरु करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे व शामराव धनगर यांनी दिला यावेळी प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्तिथ होते.