पाचोरा:-कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा -भडगाव च्या मुख्य मार्केट यार्ड परिसरात आज मा.मंत्री गिरीश महाजन आणि जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत सभापती सतीश शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले त्यात प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा तसेच उपबाजार भडगाव व वरखेडी येथील सी.सी.टी.व्ही. यंत्रणेचे उद्घाटन, पाचोरा येथील मुख्य मार्केट यार्ड मधील अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण, शेतकऱ्यांचा भाजीपाला लिलावासाठी स्वतंत्र नवीन जागा विकसित करून त्याचे उद्घाटन, व्यापारी बांधवांच्या ऑफिससाठी नियोजित जागेची पाहणी व नवीन बांधलेल्या संरक्षण भिंतीची पाहणी असे विविध विकास कामांचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती परिसरातील सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी बाजार समिती पाचोरा व उपबाजार भडगाव व वरखेडी येथे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली असून बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी व हमाल मापाडी बांधव तसेच व्यापारी बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे सुलभ स्वच्छतागृह उभारणी करण्यात आलेली असून,शेतकऱ्यांना रोज सकाळी भाजीपाला लिलावसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र पद्धतीने जागा विकसित करण्यात आलेली आहे. त्यासोबतच नवीन संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून व्यापारी बांधवांच्या ऑफिससाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच भविष्यात देखील शेतकरी हमाल मापाडी तसेच व्यापारी बांधवांच्या हितासाठी विविध विकास कामे करण्याचा मानस यावेळी सभापती सतीश शिंदे व उपसभापती ॲड.विश्वासराव भोसले यांनी आपल्या सर्व संचालकांसह व्यक्त केला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती सतीश शिंदे यांच्यासह सर्व संचालक यांच्या नेतृत्वात बाजार समितीत लोकाभिमुख व शेतकरी हिताचे उपक्रम व विकास कामे होत असून जिल्ह्यात पाचोरा भडगाव बाजार समिती अत्यंत उल्लेखनीय काम करीत आहे असे यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा संचालक सदाशिवपाटील, संचालक बन्सीलाल पाटील,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,आदी उपस्थित होते याप्रसंगी उपसभापती ॲड.विश्वासराव भोसले, संचालक नरेंद्र पाटील,दिलीप मन्साराम पाटील,धोंडू हटकर,शंकरआप्पा बोरसे,कल्पेश संघवी, बी.बी.बोरुडे (सचिव) तसेच सर्व संचालकांनी उपस्थित राहून आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.