जळगाव, (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराजांनी उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढत सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असल्याचे प्रतिपादन जि.प.विद्यानिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य यशवंत मोरे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराजांच्या १४६ व्या जयंती निमित्त जि.प. विद्यानिकेतन येथे सोशल डिस्टन्सचे पालन करीत महाराजांच्या प्रतिमेला प्राचार्य मोरे यांनी माल्यार्पण केले. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, शिक्षक एस.बी. महाले व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य मोरे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले.