वरणगाव,(अंकुश गायकवाड):- जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी शासनातील आपली पत दाखवून हा प्रकल्प जिल्ह्यातच राहावा, यासाठी प्रयत्न करावे, असे आव्हान खडसे यांनी दिले आहे. आपण मंत्री असताना मोठे प्रयत्न करून हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात आणले होते. विशेष म्हणजे, त्यासाठी लागणारी 110 एकर जागाही शासनाकडे हस्तांतरित केली होती. तसेच त्यासाठी निधीही आपण आणला होता. मात्र, आता हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आला आहे.
भाजपनेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांनी हतनूर, वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. मात्र, आता ते अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे पळविण्यात आले आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, यावर खुद्द खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी शासनातील आपली पत दाखवून हा प्रकल्प जिल्ह्यातच राहावा, यासाठी प्रयत्न करावे, असे आव्हान खडसे यांनी दिले आहे. आपण मंत्री असताना मोठे प्रयत्न करून हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात आणले होते. विशेष म्हणजे, त्यासाठी लागणारी 110 एकर जागाही शासनाकडे हस्तांतरित केली होती. तसेच त्यासाठी निधीही आपण आणला होता. मात्र, आता हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोणताही नवीन प्रकल्प आलेला नाही; परंतु जिल्ह्यात मंजूर झालेला प्रकल्पच पळविण्यात आला आहे. त्यामुळे हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय आहे. आपण या अन्यायाविरुद्ध लढणार आहोत. जळगाव जिल्ह्यातच हा प्रकल्प राहावा, यासाठी मी स्वत: तसेच खासदार रक्षा खडसे शासनाला पत्र देणार आहोत.
जनतेनेही आवाज उठवावा
जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पच हलविला जात असेल तर जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना हे आव्हानच आहे. त्यांना हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित न होता जळगाव जिल्ह्यातच राहावा, यासाठी शासन दरबारी आपली पत दाखवावी, पालकमंत्र्यांनीही यासाठी प्रयत्न करावेत, जनतेनेही हा प्रकल्प जिल्ह्यात राहावा, यासाठी आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.