मुक्ताईनगर, (प्रमोद सौंदळे) – येथील सागर सीड्स कृषी केंद्रात कृषी विभागाची परवानगी न घेता कीटक नाशके व खते ठेऊन विक्री करत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने कारवाई होणार असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील हरताळा मानेगाव सातोड निमखेडी खामखेडा येथील शेतकऱ्यांनी खता संदर्भात कृषी केंद्र चालक विरोधात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तकरारी दिल्या असता तक्रारींची दखल घेऊन आमदार श्री.पाटील यांनी कृषी विभागाचे अधिकारी अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी श्री. व्यवहारे यांना घेऊन थेट कृषी केंद्र गाठत कृषीकेंद्राची तपासणी केली. सागर सीड्स या कृषी केंद्रावर अनेक प्रमाणात त्रुटी आढळून आल्या असल्याने पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी स्तरावरून कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.