जळगाव : (दि.२०) : १ जुलै पासून सुरु होणाऱ्या नवीन रोटरी वर्षांसाठी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदी येथील उद्योजक तुषार चित्ते यांची तर मानद सचिवपदी केकल पटेल यांची निवड झाली आहे. श्री. चित्ते हे येथील हर्ष इंडस्ट्रीजचे संचालक आहेत तर श्री. पटेल हे मोना आईस्क्रीमचे संचालक आहेत.
नवीन कार्यकारिणीमध्ये संजय इंगळे (उपाध्यक्ष) कृष्णकुमार वाणी (प्रेसिडेंट इलेक्ट), प्रवीण पाटील (जॉईंट सेक्रेटरी ), विवेक काबरा (खजिनदार), विनीत जोशी (सह खजिनदार), रमण जाजू (मेम्बरर्शीप कमिटी चेअरमन), अनंत भोळे (पी आर कमिटी चेयरमन), योगेश भोळे (पी आर कमिटी को चेयरमन ) , संगीत पाटील (क्लब ऍडमिनिस्ट्रेशन), डॉ. राजेश पाटील (मेडिकल कमिटी), सुनील सुखवानी (नॉन मेडिकल कमिटी), संदीप काबरा (रोटरी फाउंडेशन), ऍड सुरज चौधरी (युथ सर्व्हिस), गनी मेमन (क्लब ट्रेनर), यांचेसह अरुण नंदर्षी, अनिल कांकरिया, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, सुनील अग्रवाल, चंद्रकांत सतरा, योगेश राका , अनुप असावा, समकीत मुथा यांचा समावेश आहे.
श्री चित्ते आणि त्यांची नूतन कार्यकारिणी १ जुलै रोजी सूत्र हाती घेतील . रीतसर होणारा पदग्रहण समारंभ हा कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासकीय सुचनेनुसार आयोजित केला जाणार आहे.