हल्लेखोर दुचाकीने पसार ; घटनेमुळे शहरात खळबळ
भुसावळ- येथील पालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यावरील विहिरीवर पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर दोघांनी दुचाकीने येत तलवारीने डोके , हात पायांवर हल्ला केल्याची घटना आज शनिवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास येथे घडल्याने खळबळ उडाली असून अज्ञात हल्लेखोर दुचाकीने पसार झाले .विकास देविदास कोळी असे जखमी इसमाचे नाव आहे. जखमीला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले असून हल्ल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे .